मधुकर देशपांडे - लेख सूची

द नर्मदा डॅम्ड : पुस्तक परिचय

भारत स्वतंत्र झाल्यापासून गेल्या पंचावन्न वर्षांत आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे “आधुनिक भारतातील मंदिरे’ हे बाबावाक्य प्रमाण मानून अनेक मोठी आणि छोटी धरणे आपण बांधली. ही धरणे आपण आपली विभूषणेच मानली. स्वतः नेहरूंचा मोठमोठ्या प्रकल्पांबद्दल भ्रमनिरास झाला होता असे त्यांच्या मृत्युपूर्वीच्या एका भाषणांत आढळते. “आपणास असा पर्याय शोधावा लागेल ज्याच्या उत्पादन पद्धतीत जास्तीत जास्त …

एन्रॉनची अजब कथा

माझ्या लहानपणी मी ‘अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा’ आवडीने वाचल्याचे आठवते. महाराष्ट्रात गेली दहाबारा वर्षे गाजणारे एन्रॉन या बहुदेशीय कंपनीचे प्रकरण अशाच एका सुरस, चमत्कारिक आणि नाट्यमय कथे-सारखे आहे. काही राजकारण्यांचा आणि बाबूंचा भ्रष्टाचार एवढेच या प्रकरणाचे स्वरूप नसून अधिक गहन असावे असे वाटण्यासारख्या बऱ्याच घटना एन्रॉनच्या बाबतीत घडल्या आहेत. आता एन्रॉनचा पहिला टप्पा …

पुस्तक परिचय दि रिव्हर अँड लाइफ

आतापर्यंत नर्मदा नदीवरील सरदार धरणास विरोध करणारे आणि धरण-विरोधाची चिकित्सक तसेच विवेकी कारणमीमांसा देणारे बरेच साहित्य प्रकाशात आलेले आहे. बाबा आमटे (Cry the Beloved Narmada), क्लॉड अल्वारिस आणि रमेश बिलोरे (Damming the Narmada), अश्विन शाह (Water for Gujarat), जसभाई पटेल (Myths Exploded: Unscientific Ways of Big Dams on Narmada), हिमांशु ठक्कर (Can Sardar Sarovar Project …

चर्चा : संदर्भ न पाहता लावलेले अर्थ

संपादक आजचा सुधारक यांस, स.न.वि.वि. “संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ” हे, याच नावाने लिहिलेल्या (आजचा सुधारक, मे १९९४) के. रा. जोशी यांच्या लेखातील मजकुराचेच रास्त वर्णन असावे असे वाटते. ‘मनूची निंदा करण्यासाठी ज्या वचनाचा भरमसाठ आधार घेतला जातो. या प्रस्तावासह ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ चा जोशी यांनी दिलेला अर्थ असा की “स्त्रियेला कुठल्याही अवस्थेत संरक्षणासाठी …